चारोळ्या तश्या छोट्या आणि लिहायला पण थोड्या सोप्या....
१. डावी खळी
रम्य ती संध्याकाळ क्षितिजाइतकीच तुझी धुंद साथ...
तुझ्या चेहऱ्यावर आलेली ती सूर्याची लाली...
की चंद्रानेच चोरली तुझी डावी खळी.....
२. साथ
तू 'मम' म्हणालीस तरच या आहुतीला अर्थ आहे...
तुझीच साथ नसेल तर जिंकलेले अश्वमेध हि व्यर्थ आहेत..
३. वादळ..
प्रारब्धाच्या विचारामध्ये डोक्यात मोठे वादळ उठले..
त्या वादळामध्ये , मनगटाचे बळ मात्र कुठल्या कुठे विरून गेले..
४. लपंडाव
आशा-निराशेचा लपंडाव आहे म्हणून तर जगण्यात वेगळी मज्जा आहे..
निराशेच्या भीतीने हताश होण हि तर जन्मठेपेची सजा आहे..
५. साक्ष
आशेचा एक अंधुकसा किरण सुद्धा माझ्या प्रेमाची साक्ष देणारा..
आणि मी... तुझ्या साथीच्या जन्मठेपेसाठी आशेचा किरण जपणारा..
६. जन्मठेप
माझी साथ तर तुला कायम आहे
तुला पडायचा नसेल जन्माठेपेतून बाहेर ..
पण तिथे सुद्धा स्वर्ग बनवणं
एवढंच माझ्या हातात आहे..
७. हसरी खळी..
मी तुला विसरलो असं जगाला ओरडून सांगतो..
हसऱ्या तुझ्या खळीवरती अजून का मी झुरतो....
८. पुन्हा डावी खळी..
मला अचानक बघून लाजलेली तू..
तुझ्या गालावर चढलेली ती लाली..
आणि मग अजूनच खुलून दिसणारी ती डावी खळी....
९. खळी...
तू प्रयत्न करतेस खळी लपवायचा ..
मग तुझ्या गालावर आपोआप बट येते
केसांमागे लपलेली ती खळी...
वारा आल्यावर कशी खुदकन हसते..



