हृदय गुंतता हे जीव वेडावतो
मुग्ध या मनाचा ताल झंकारतो
तू असलीस दूर तरीही, स्पर्श हा शहारतो
स्तब्ध तुझ्या अस्तित्वाचा, आभास खुणावतो..
अस्पष्ट तुझ्या गाण्याचा, सूर आलापतो
हृदयाच्या ठोक्यामधूनी, मग मल्हार सुरावतो..
श्वासाच्या अडकण्याचा, अर्थ मज उमजतो
माझ्या अस्तित्वाचा व्यर्थ भाव मावळतो..
मृद्ग्न्धातूनी या, गजरा तुझा सुवासतो
चिंब ओल्या आठवणींचा, डोळा मग पाणावतो..
