Powered By Blogger

Monday, July 19, 2010

साद..




वाट पाहतो मी त्या सादेची..
आता तरी हाक दे...
श्वासाला आहे आस श्वासाची..
आता तरी मिठीत ये..

पंख आहेत तुझ्या मनाला..
त्या पंखाना बळ दे..
किती झुरशील त्या स्पर्शाला..
तुझ्या मनाला साथ दे..

अवखळ चंचल नदीच तू..
समुद्राची दिशा घे..
साद घालेल तो लाटांनी...
तू स्वत:ला झोकून दे..

Friday, July 16, 2010

आज पुन्हा ती भेटली..

आज पुन्हा ती भेटली..
अन मनाने उंच झेप घेतली.

पुन्हा तोच अल्लड वारा..
साद घालतो त्या शपथांची..
साथीस त्याच्या सुगंध फुलांचा..
करी आठवण त्या भेटींची ...
आज पुन्हा ती भेटली..

गुंजन करीत पक्षी तसेच...
करीत आठवण तिला वेळेची..
परतत घरट्याकडे देतात मज वचन...
सकाळच्या भेटीची..
आज पुन्हा ती भेटली..

तोच सूर्य मावळतीचा...
साक्षीदार तो त्या विरहाचा..
चंद्र दिसे दूर क्षितिजावरती.....
देत आश्वासन पुन्हा भेटीची..
आज पुन्हा ती भेटली..

Thursday, July 1, 2010

मैत्रीण



विचार येतो मनामध्ये कधी कि असावी एक मैत्रीण...
पण मैत्रीण म्हणजे नक्की कोण..??

उत्तर सापडत पण उमगत कधीच नाही....
आणि ते शब्दांमध्ये व्यक्त तर कधीच होत नाही...

हो, कारण हे नात असत असच शब्द्नापलीकडच....
कोणी न सांगताच एकमेकांना समजण्याच..
न बोलताच हृदयांची भाषा समजण्याच..
नुसत्या आठवणीने एकमेकांना साद घालायचं..

मैत्रीण असते तरी कोण हो ?

एक अव्यक्त प्रेम एक निस्सीम चाहत..
एक प्रेमळ काळजी एक निरंतर विश्वास..
एक खळाळता झरा एक सुखद सहवास..
एक बेधुंद साथ तरीपण हक्कान धरलेला कान..

एक नजरे पलीकडच जग.. एक कल्पने पलीकडच अस्तित्व...
वसंतातली एक सुंदर झुळूक.. श्रावणातला रिमझिम धारा ..
शिशिरातली हवीहवीशी उब. आणि आषाढातला एक बेभान पाउस..
आणि तरीपण वैशाखातली होरपळ आणि विजांचे अखंड तांडव..

म्हंटल तर सरस्वतीची निखळ शांतता.. आणि लक्ष्मीचा अल्लडपणा
म्हंटल तर भवानी चा कोप आणि ... आणि साक्षात दुर्गा..