
मी एक मुक्तछंद...
फक्त थोडासा जखडलेला..
मी खट्याळ मी खोडकर....
पण छडीला घाबरणारा.....
मी एक मुक्तछंद...
फक्त थोडासा जखडलेला..
मी उनाड मी मस्तमौला..
पण घड्याळाच्या काट्यात अडकलेला
मी एक मुक्तछंद..
फक्त थोडासा जखडलेला..
मी अनंत मी अफाट..
पण अस्तित्वासाठी लढणारा
मी एक मुक्तछंद...
फक्त थोडासा जखडलेला
मी रसिक मी चाहता.
पण दाद देताना मात्र हात थोडा आखडणारा
मी एक मुक्तछंद...
फक्त थोडासा जखडलेला..
मी नाती जपणारा
पण त्या बंधनात थोडा जास्तच गुरफटलेला
मी एक मुक्तछंद...
फक्त थोडासा जखडलेला..
मी .. हूं... मी प्रियकर...
कधी नकाराला तर कधी समाजाला घाबरणारा..
मी एक मुक्तछंद...
फक्त थोडासा जखडलेला..
मी खरच एक मुक्तछंद
कसलीच बंधने न मानणारा
कविता लिहिताना मात्र
यमक जुळवणारा..
मी एक मुक्तछंद...
फक्त थोडासा जखडलेला..

तीन च अक्षरे! .... सु रे ख !
ReplyDeleteखरेच सुंदर !
ReplyDeletevery nice...:)....amazing!!!!
ReplyDeletesurekh mitra...
ReplyDeletechan lihili aahes... keep it up - gauri
ReplyDeleteमी संथ वारा..
ReplyDeleteमी बेताल किनारा..
मी सूर्य तारा..
मी थंड गारा..
मी आसमंत सारा...
मी चंद्र न्यारा..
एकट्या जिवाचा..
मी फ़क्त एक निवारा.
छान आहे रे कविता !
ReplyDeletemasta aahe...
ReplyDeletenoopur p
agadi barobar... shabda n shabda.... fakta daad detana farach akhadta haat ghenara... :P :P ;)
ReplyDelete