Powered By Blogger

Wednesday, February 16, 2011

पुन्हा एक नवीन डाव.....

पुन्हा एक नवीन डाव ... आणि तीच जिंकायची आस..
एक नवी साथ... पाठीवर हवीहवीशी पण नविनच थाप
पुन्हा एक नवीन डाव..

पुन्हा अनोळखी मैदान.. तेवढेच अनोळखी अव्हान ..
पण फक्त जिंकायचेच ह्यावर मात्र मी ठाम..
पुन्हा एक नवीन डाव..

अनोळखी वळणाची अनोळखी पायवाट
खाचा खळग्यांची समृध्द ती खाण..
मात्र पलीकडच्या दुनियेची किती हि हाव..
पुन्हा एक नवीन डाव..

क्षितिजापाराचा किनारा..
वाटेतल्या वादळाची भीती मनात..
तरी किनारा शोधायचा हट्ट अफाट..
पुन्हा एक नवीन डाव..

2 comments:

  1. गंभीरच तोरा
    हरभजनचा होरा
    क्रिकेटचा बाप सामोरा
    भाकीत ठाऊक पोरासोरा

    जणू सिंह येत मैदानात
    प्राणी सर्व पळती बिळात
    तैसे सचिनच्या खेळात
    हरतील सारे पळ भरात

    दोन हजार अकरा
    विश्वकप भारतातच बरा
    तापविल पोंटिंगचा पारा
    सचिनच भरात रत्न खरा

    कमलाकर विश्वनाथ आठल्ये
    १९-०२-२०११

    ReplyDelete
  2. गंभीरच तोरा
    हरभजनचा होरा
    क्रिकेटचा बाप सामोरा
    भाकीत ठाऊक पोरासोरा

    जणू सिंह येत मैदानात
    प्राणी सर्व पळती बिळात
    तैसे सचिनच्या खेळात
    हरतील सारे पळ भरात

    दोन हजार अकरा
    विश्वकप भारतातच बरा
    तापविल पोंटिंगचा पारा
    सचिनच भारत रत्न खरा

    कमलाकर विश्वनाथ आठल्ये
    १९-०२-२०११

    ReplyDelete