Powered By Blogger

Monday, July 19, 2010

साद..




वाट पाहतो मी त्या सादेची..
आता तरी हाक दे...
श्वासाला आहे आस श्वासाची..
आता तरी मिठीत ये..

पंख आहेत तुझ्या मनाला..
त्या पंखाना बळ दे..
किती झुरशील त्या स्पर्शाला..
तुझ्या मनाला साथ दे..

अवखळ चंचल नदीच तू..
समुद्राची दिशा घे..
साद घालेल तो लाटांनी...
तू स्वत:ला झोकून दे..

6 comments:

  1. नदी म्हणशील मला..
    कवेत घेशील मला..
    सांग मला सागरा..
    साथ देशील मला..

    पंख माझे छोटे..
    कुठवर झेप घेतील..
    विस्तारलेला तू..
    अश्रूच फक्त झिरपतील..

    मन माझे फुलले..
    साद ऐकून कधी..
    श्वासात तुझ्या रमली..
    सागराची नदी..

    ReplyDelete
  2. चिमुकलेच पंख तुझे..
    आहेत ताकद सागराची
    आहे जिद्द अपार परी
    साथ तुझी हवी..

    ReplyDelete
  3. स्वप्न बघेन..
    स्वप्न विणेन..
    स्वप्नातल्या पंखांनी..
    नवीन स्वप्न जगेन..

    अपार ताकद सागराची..
    आसमंत खुला..
    स्वप्नातल्या पंखांनी..
    तुझं स्वप्न बघेन..

    ReplyDelete
  4. असेच जर फिरत राहिलात,
    आणि असेच जर झुरत राहिलात,
    आठवणीच तुमच्या पदरात राहतील,
    हे नदी ,हे समुद्रा,
    सांग कधी हे बंध विरघळतील

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete